Linked Node

Content

क्षयरोगासाठी  जोखीम ग्रस्त असुरक्षित लोकसंख्या


क्षयरोग कोणालाही प्रभावित करू शकतो परंतु काही समुदायांमध्ये तो अधिक प्रमाणात आढळून येतो.  खाली नमूद केलेल्या विविध कारणांमुळे टीबी रोगास बळी पडतात:

खालील व्यक्ती जिथे राहतात किंवा काम करतात तिथे क्षयरोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
● कैदी
● झोपडपट्टीत राहणारे
● खाण कामगार
● हॉस्पिटल अभ्यागत / भेट देणारे नातेवाईक
● आरोग्यसेवा कर्मचारी

दर्जेदार टीबी आरोग्य सेवांचा सहज फायदा घेण्यावर मर्यादा येतात 
● स्थलांतरित कामगार
● रोजंदारी वर काम करणारे मजूर
● लिंग असमानता असलेल्या सेटिंग्जमध्ये महिला, मुले
● शारीरिकदृष्ट्या विकलांग
● तृतीयपंथी समुदाय

● आदिवासी आणि दुर्गम भागात राहणारे लोकसंख्या
● निर्वासित किंवा अंतर्गत विस्थापित लोक
● बेकायदेशीर खाण कामगार आणि कागदपत्र नसलेले स्थलांतरित

जैविक किंवा वर्तणुकीशी संबंधित घटकांमुळे जोखीम वाढली आहे आणि ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली आहे, अश्या व्यक्ती खालीलप्रमाणे -
● एचआयव्ही ग्रस्त 
● मधुमेह किंवा सिलिकोसिस 
● इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी घेणारे
● कुपोषित 
● तंबाखूचा वापर करणारे
● मद्यपान करणारे.
● नसेतून औषधे घेणारे 
 

Content Creator

Reviewer