Linked Node

Content

टीबी रुग्णांवर कलंकाचे परिणाम

वैयक्तिक पातळीवर

  • आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाचा अभाव
  • भावनिक विलगीकरणाची भावना, अपराधीपणाची भावना आणि चिंता
  • शारीरिक तसेच आर्थिक दुर्बलता
  • लोक, बहुतेकदा महिलांना, त्यांची घरे सोडण्यास भाग पाडले जाते.
  • लक्षणे लपविणे आणि वैद्यकीय सेवा मिळविण्यात संकोच करणे यामुळे रोगाचे उपचार व्यवस्थापन अधिक कठीण बनवते.
  • विलंबित निदान,खंडीत उपचार ज्यामुळे पुढील संक्रमण आणि DRTB होऊ शकते
  • असुरक्षितता वाढते, एकाकीपणा आणि लोकलाजेस्तव आत्महत्येचे विचार येऊ शकतात.

 

कौटुंबिक आणि समुदाय स्तरावर

  • कौटुंबिक उत्पन्नामध्ये घट
  • टीबी रुग्णाची काळजी घेणाऱ्यांना संसर्ग होण्याच्या जोखमीमुळे उत्पादकता कमी होते आणि गरिबीचे चक्र पुढे चालू होते.
  • संक्रमित व्यक्तींना त्यांच्या समुदायातील लोकांकडून वाळित टाकणे आणि त्यांना कलंकित करणे.
  • प्रभावित आणि संक्रमित लोकांच्या  सांस्कृतिक आणि धार्मिक रिती रिवाज मधे ज्ञानाचा अभाव आणि खोलवर रुजलेले गैरसमज आहेत.
  • समाजातील प्रतिष्ठा कमी होणे आणि रोगी व्यक्तींवर, त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांवर, त्यांच्या कुटुंबावर, मित्र परिवारावर आणि समाजावर नकारात्मक परिणाम होणे. 
  • टीबी ही पापांची किंवा उल्लंघनाची शिक्षा आहे, आणि हा एक कलंक आहे ही भावना /गैरसमज सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांमुळे समाजात खोलवर रुजलेला आहे

Content Creator

Reviewer