Linked Node
TB Aarogya Sathi
Learning ObjectivesTb Aarogya Sathi Application
टीबी आरोग्य साथी अॅप
टीबी आरोग्य साथी अॅप नागरिकांना सामर्थ्य देते आणि (NTEP अंतर्गत TB रूग्णांसह) आरोग्य सेवा प्रणालीशी थेट संवाद साधण्याची सेवा देते. या अॅपचा उद्देश भारत सरकारच्या केंद्रीय क्षयरोग विभागाच्या पुढाकाराने नागरिकांमध्ये सक्रियपणे जागरूकता वाढवणे आणि देशातील सर्व नागरिकांना मोफत आणि दर्जेदार खात्रीशीर औषधे आणि निदानाची उपलब्धता सुनिश्चित करणे हे आहे.
टीबी आरोग्य साथी अॅप वापरणार्या नागरिकांना टीबी संबंधी सामान्यतःविचारण्याजोगे प्रश्नांची उत्तरे,टीबी ची लक्षणे आणि टीबी विरोधी औषधांचे दुष्परिणामयांची माहिती मिळू शकेल. कोणताही वापरकर्ता अॅप वापरून, क्षयरोगाचे निदान करण्यात मदत करू शकतील अशा जवळच्या आरोग्य संस्था सहज शोधू शकेल.
निक्षय मध्ये नोंदणीकृत रुग्णांना औषधोपचार पालन, उपचार प्रगती आणि DBT डीबीटी तपशिलांशी संबंधित माहिती सहज मिळू शकते
नागरिक:
- अॅप वापरणाऱ्या सर्व नागरिकांसाठी माहितीपूर्ण सामग्री उपलब्ध आहे (या सामग्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी लॉगिन आवश्यक नाही)
- टीबी बद्दल माहिती
- टीबीची लक्षणे
- टीबीचे दुष्परिणाम
- आरोग्य संस्था/ सुविधा शोध
- BMI मूल्यांकन
- निक्षय संपर्क हेल्पलाइन
- प्रेरक व्हिडिओ
- पौष्टिक सल्ला
रुग्ण:
- निक्षेमध्ये नोंदणीकृत रुग्णांना अतिरिक्त माहिती मिळते. (लॉग इन केल्यानंतर)
- औषधोपचार पालन तपशील
- उपचार प्रगती तपशील
- DBT तपशील
टीबी आरोग्य साथी अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे आणि हा QR कोड वापरून डाउनलोड करता येईल.
आकृती: टीबी आरोग्य साथी ऍप्लिकेशन स्नॅपशॉट
Content Creator
Reviewer
Target Audience
- Log in to post comments